अनिल देशमुखांना दिलासा; सीबीआयकडून दुसरी चौकशी नाही?

Anil Deshmukh - CBI - Maharastra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचीही चौकशी झाली आहे. मात्र आता देशमुख यांना दिलासा मिळाला आहे. सीबीआयच्या दुसऱ्या चौकशीतून अनिल देशमुख बचावले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी करणारे पथक दिल्लीला परतले आहे. सीबीआय दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.

१०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. या अंतर्गत सीबीआयने निलंबित सहपोलीस निरीक्षक सचिन वाझेसह अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव कुंदन शिंदे व संजीव पलांडे यांचीही चौकशी करण्यात आली. स्वत: अनिल देशमुख यांचीही साडेनऊ तास चौकशी झाली. त्यानंतर देशमुख यांची पुन्हा चौकशी होईल, अशी शक्यता होती. पण आता त्यांची या चौकशीतून काहीशी सुटका झाल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांनुसार, सीबीआयचे चौकशी पथक दिल्लीला परतले आहे. देशमुख यांची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. तसेच अन्य संबंधितांच्या चौकशीतून मिळालेली माहिती व सर्वांच्या जबाबांच्या आधारे दिल्लीतच या चौकशीचा अहवाल तयार करण्यात येईल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २० एप्रिलपर्यंत हा अहवाल सीबीआयला सादर करायचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button