
मुंबई : इतर मागासवर्गीय समाजातील (ओबीसी) (OBC) आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांना, उमेदवारांना नॉन क्रिमीलेयरबाबत दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रवर्गातील अर्जदारास यापुढे नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी कुटुंबांतील शेती व नोकरीचे उत्पन्न वगळून इतर स्त्रोतांपासून मिळणारेच केवळ उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे जास्त उत्पन्नाच्या अभावी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय टाळला जाणार आहे.
ओबीसी व एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना, उमेदवारांना नॉन क्रिमीलेयर गटातील असल्याचे दाखविण्यासाठी प्रमाणपत्र काढावे लागते. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला हा मुख्य स्त्रोत लक्षात घेतला जातो. मात्र, आजवर असा उत्पन्नाचा दाखला देताना कुटुंबांतील (आई, वडिल) यांचे शेतीपासून आणि नोकरीपासून मिळणारे उत्पन्न ग्राह्य धरले जात होते. मात्र, या प्रवर्गातील अर्जदारांवर यामुळे अन्याय होत असल्याचे तक्रारी येत होत्या. अखेर याबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले. त्यानुसार, उत्पन्नाचा दाखला देताना आई/वडिल/ आई आणि वडिल यांचे शेतीपासून आणि नोकरीपासूनचे उत्पन्न वगळून अन्य स्त्रोतांपासूनचे मिळालेले उत्पन्नच केळ ग्राह्य धरले जाईल, असे परिपत्रकात म्हटले आहे. यामुळे ओबीसी व एनटी प्रवर्गातील राज्यातील लाखो होतकरूंना याचा फायदा होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला