राज्यपालांकडून येणारे संभाव्य अडथळे लक्षात घेऊन विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचा सावध पवित्रा

Vidhan Bhavan - Mahavikas Aghadi

मुंबई : राज्यात तीन पक्षाचे एकत्रित सरकार सत्तेत आल्यानंतर राज्याच्या राजकीय पटलावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये संवादाचा अभाव दिसून आला. राज्याच्या हिताचे प्रश्न महाविकास आघाडीकडून सोडवण्यात विलंब होेताना दिसला. ते पाहून सरकार स्थापनेपासूनच राज्यपालांना राज्याच्या कारभारात लक्ष घालावे लागत आहे असे दिसते. राजकारण बाजूला ठेवून राज्यहिताचे, घटनेला अनुसरून निर्णय त्वरित घेण्याच्या दृष्टीने राज्यपाल कोशियारी यांना आतापर्यंत राज्याच्या अनेक लहान सहान बाबींमध्ये हस्तक्षेप करावा लागला आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या 12 जागांच्या नियुक्तीवरूनही राज्यपालांच्या दालनातून कोणते अडथळे येऊ नये यासाठी महाविकास आघाडीने आधीच सावध पवित्रा घेतला आहे.

विज्ञान, साहित्य, कला, सहकार, सामाजिक कार्य, आदि क्षेत्रांतील व्यक्तींच्या विधान परिषदेतील नियुक्त 12 जागांचा सहा वर्षांचा कालावधी येत्या 6 जूनला संपत आहे. या जागांच्या नियुक्तीसाठी राज भवनातील संभाव्य अडथळ्यांचा विचार करून महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतला आहे. या 12 जागांवर नियुक्ती करताना कोणतीही अ़डचण येवू नये असा महाविकासल आघाडीने ठरवले आहे.

विधान परिषदेच्या विज्ञान, साहित्य, कला, सहकार, सामाजिकत कार्ये या क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. त्यानुसार या 12 जागांवरील नियुक्ती राज्य सरकार करू शकते.

मात्र, राजभवनातील संभाव्य अडथळे लक्षात घेऊन या 12 जागांसाठी महाविकास आघाडी काय़दे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढचे पाऊल टाकणार असल्याचे समजते. या नियुक्त्यांबाबत राज्यपालांनी तरतुदींवर बोट ठेवून काही प्रश्न उपस्थित करू नये, यासाठी ही खबरदारी घेतली जाणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER