मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिकेवर विचार सुरू; एकनाथ शिंदेंची माहिती

Eknath Shinde

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने पारित केलेला मराठा आरक्षणासंदर्भातला कायदा रद्द ठरवला. यामुळे सर्वत्र वादंग उठले आहे . मराठा आरक्षणाबाबत पुढे काय पाऊल उचलायचं? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका करता येईल का? यावर विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे सध्या सोलापूर दौऱ्यावर असून सोलापुरात त्यांच्या हस्ते एक हजार खाटांच्या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर कुणीही राजकारण करू नये.

केंद्रात भाजपाचं सरकार आहे. यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा भेदभाव न करता सर्वांनी मराठा समाजासाठी काम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे शिंदे म्हणाले. न्यायालयाचा निकाल मराठा समाजासाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक आहे. निकालाचा दिवस सगळ्यांसाठीच काळा दिवस ठरला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण प्रयत्न केले गेले. उच्च न्यायालयात जी वकिलांची टीम होती, त्यामध्ये अजून वकिलांची फौज वाढवली. पण दुर्दैवाने निकाल विरोधात गेला, असं ते म्हणाले. राज्य सरकारने पारित केलेला कायदा रद्द करतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्यासंदर्भातले अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना असल्याचंदेखील यावेळी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button