‘कोरोना’ची संभाव्य लाट विचारात घेऊन आरोग्य सुविधा उभारणीवर भर द्या – अजित पवारच्या सूचना

Ajit Pawar - Maharashtra today

बारामती :- राज्यात कोरोनाचे संकट लक्षात घेता उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्वाची पाऊले उचलले आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी तालुक्यातील आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेवून लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करावी. शासकीय व खाजगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी, असे पवार म्हणाले .

‘म्युकरमायकोसिस’ रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांचा व लहान मुलांवर करावे लागणाऱ्या उपचारासाठीच्या औषधांची तसेच उपचाराकरीता लागणाऱ्या इतर काही साधनसामुग्रीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तसेच कोरोना बाधित झालेल्या लहान मुलांच्या पालकांची देखील राहण्याची सोय करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी पवार यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : ‘आज अजित पवार मुख्यमंत्री असते तर’, रोहित पवारांनी दिले सर्वसमावेशक उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button