
- मद्रास हायकोर्टाची पंतप्रधान कार्यालयास सूचना
चैन्नई : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले अतुलनीय योजगान लक्षात घेऊन त्यांचा फोटो चलनी नोटांवर छापण्याच्या विनंतीचा सरकारने विचार करावा, अशी सूचना मद्रास उच्च न्यायालयाने केली आहे. अशा प्रकारची विनंती करणारे निवेदन के. के. रमेश या नागरिकाने २० जानेवारी रोजी पंतप्रधान कार्यालयास (PMO) पाठविले होते. परंतु त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने सरकारला तसा आदेश देण्यासाठी त्यांनी रिट याचिका केली. नेताजींचा फोटो चलनी नोटांवर छापला तर त्यांचे देशासाठीचे योगदान सदैव लोकांपुढे राहील असे त्यांचे म्हणणे होते.
केंद्र सकारच्या वतीने अॅड. जी. थलाईमुथरसु म्हणाले की, याचिकाकर्त्यास कितीही प्रकर्षाने असे वाटत असले तरी न्यायालय असा आदेश देऊ शकत नाही. यावर रमेश यांनी अशी विनंती केली की, निदान मी दिलेल्या निवेदनावर विचार करण्यास तरी सांगावे. न्या. एम. एम. सुंदरेश यांनी सरकारचे म्हणणे मान्य केले. परतु रमेश यांच्या निवेदनावर ‘पीएमओ’ने विचार करावा, अशी सूचना त्यांनी याचिका निकाली काढताना केली. न्यायालयाने असेही नमूद केले की, नेताजींच्या थोरवीविषयी आम्ही वेगळे काही सांगायची गरज नाही. पण सध्याच्या तसेच बावी पिढ्यांनाही कळण्यासाठी देशाचा गौरवशाली इतिहास पुन्हापुन्हा सांगत राहायला हवा.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला