‘लॉकडाऊनबाबत विचार करा !’ सर्वोच्च न्यायालय आणि टास्क फोर्सचा केंद्राला सल्ला

Supreme Court

नवी दिल्ली :- कोरोनासोबत लढण्यासाठी, देशात कोरोना (Corona) संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आणि द लॅन्सेट इंडिया टास्क फोर्सने केंद्र सरकारला काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. लोकहितासाठी दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा विचार करू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले आहे. तर टास्क फोर्सनेही केंद्र सरकारला काही शिफारशी केल्या आहेत. यामध्ये लॉकडाऊनचाही उल्लेख आहे. टास्क फोर्सने केंद्राला सूचनांचा स्वीकार करताना लॉकडाऊनच्या चर्चेच्या पुढे यावर विचार केला पाहिजे, असं म्हटलं आहे.

लॉकडाऊन लावण्याआधी सरकारनं हे निश्चित करावं की, याचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम कमी होईल. तसंच ज्या लोकांवर लॉकडाऊनचा परिणाम होऊ शकतो, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करावी. जर एखाद्या रुग्णाकडे राज्य/केंद्रशासित प्रदेशातील रहिवासी प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र नसेल तरीही त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि आवश्यक औषधं देण्यासाठी नकार देता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.

टास्क फोर्सने संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केला आहे. संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नसून अनेक गोष्टी करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. योग्य ठिकाणी लक्ष देत आणि समन्वय साधत परिस्थितीला हाताळणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलं आहे. “उचलण्यात येणारी पावलं स्थानिक स्थितीच्या आधारे वेगळी असू शकतात. ज्या ठिकाणी संसर्ग वेगाने पसरत आहे तिथे अनेक निर्बंध आणावे लागतील. तर जिथे संख्या कमी आहे तिथे कदाचित योग्य निर्बंध असतील. संपूर्ण लॉकडाऊनची मागणी केली जात असली तरी हा पर्याय नसल्याचं टास्क फोर्सने सांगितलं आहे. तसंच देशाची झोनमध्ये विभागणी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये कमी, मध्यम आणि हॉटस्पॉट्स अशी विभागणी असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button