संजय राऊतांच्या टीकेचा परिणाम ; 12 आमदारांची राजभवनात ‘सुरक्षित’

Governor Bhagat Singh Koshyari - Sanjay Raut

मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची (MLAs appointed by Governor) यादी राजभवनातून गायब झाल्याची माहितीने एकच खळबळ उडाली होती. यावरून सत्ताधारी पक्षाने राज्यपालांवर टीकास्त्र सोडले होते . राज्यपालांना दिलेली 12 आमदारांची यादी भुतांनी पळवली तर नाही ना?, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. त्यानंतर आता 12 आमदारांची यादी राजभवनात (RajBhavan) सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे .

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे 12 आमदारांच्या नावाचा यादी मागितली होती. यावर राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नाही असा दावा माहिती अधिकार अंतर्गत मागण्यात आलेल्या अर्जावर करण्यात आला होता .

राजभवनाकडे विधान परिषद 12 सदस्यांची यादी आपल्याकडे आहे, असा दावा राजभवन सूत्रांनी दिली. यादी हरवली नाही, विनाकरण गैरसमज करण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीने माहिती अधिकार विभागात माहिती मागितली त्या विभागाकडे लिस्ट नावे नव्हती त्यामुळे त्या विभागाने त्यांच्याकडे सदस्य नावे नाहीत, असे उत्तर दिले, अशी सारवासारव राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान गेल्यावर्षी 6 नोव्हेंबरला महाविकासघाडीतील नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब या तीन मंत्र्यांनी राजभवनात जाऊन ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. मात्र, तेव्हापासून राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीबाबत चकार शब्दही काढलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button