
मुंबई :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपाच्या वादात मनसे नेत्या रूपाली पाटील (Rupali Patil) मुंडेंच्या मदतीला धावून आल्या. त्या म्हणाल्या, बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे; परंतु अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता. २००६ पासून २०२० पर्यंत अन्याय होतोय तर आतापर्यंत का शांत बसलात? संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो.
ही बातमी पण वाचा : धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरूपाचे, राजीनाम्याबाबत पवारांचे रोखठोक विधान
याबाबत रूपाली पाटील यांनी सविस्तर फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्या म्हणतात, बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे. बलात्कार हे तुमच्या राजकारणाची खेळी बनवू नका. आणि बायांनो, तुमच्या संमतीचे शारीरिक संबंध हे राजकारणात कोणाला वापरू देऊ नका… तुमच्यामुळे खरोखर पीडितेला, बलात्कार झालेल्या, अन्याय झालेल्या भगिनींना न्याय मिळत नाही, एक महिला म्हणून लाज बाळगा.
बलात्कार (Crime) हा त्या महिलच्या इच्छेविरुद्ध तथा बळजबरीने होत असतो, संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो, असे रूपाली पाटील यांनी शेवटी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत म्हटले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला