शिवसेनेचे अनिल परब यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या जिशान सिद्दीकींची तक्रार

Anil Parab - Zeeshan Siddique

मुंबई :  शिवसेनेचे (Shiv Sena) नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) माझ्या कामात अडथळा आणतात, असा आरोप वांद्रे पूर्व मतदारसंघाचे काँग्रेसचे (Congress) आमदार जिशान  सिद्दीकी यांनी केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत झालेला पराभव परब यांनी आता तरी मान्य करावा. अन्यथा हा विषय विधानसभेत मला मांडावा लागेल, असा इशारा जिशान  सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी दिला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना  सिद्दीकी  म्हणालेत की, जनतेने मला कौल दिला आहे. मला माझ्या मतदारसंघात कामे करू द्या. मला विविध ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न अनिल परब करत असतात. माझ्या मतदारसंघात मी करत असलेली छोटी छोटी कामेदेखील वर्षभर एनओसी न मिळाल्यामुळे पडून आहेत. हे सर्व मी पत्र लिहून माझ्या वरिष्ठ नेत्यांना कळवले आहे. आता हा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही कानावर घालणार आहे. माझ्या मतदारसंघात मी केवळ यांच्यामुळे कामे करू शकत नसेल तर मला याविरोधात आवाज उठवावा लागणार आहे. त्याची सुरुवात आता झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button