काँग्रेस का हाथ द्लालों के साथ; कृषी विधेयकाच्या विरोधावरून भाजपाची टीका

Keshav Upadhye

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तयार केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांना विरोध करून काँग्रेसने – ‘काँगेस का हाथ दलालो के साथ, किसानो के खिलाफ’ असल्याचे सिध्द केले अशी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केली.

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत ते म्हणाले की, या विधेयकामुळे ‘खंडीभर पिकवून टीचभर पैसा’ मिळवणाऱ्या शेतकऱ्यांची दलालांच्या तावडीतून सुटका होणार आहे. विधेयकाविरोधातील अपप्रचाराविरोधात देशातील शेतकरी उभा राहील, असा विश्वास उपाध्ये यांनी व्यक्त केला.

गेली अनेक वर्षे शेतकरी बाजार समितीतील दलालांच्या तावडीत सापडला असून, शेतकऱ्यांचे शोषण सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पायातील ही बेडी तोडून त्याला चांगली किंमत, मिळेल तिथे आपला माल विकण्याची संधी मिळणार आहे. या विधेयकाच्या विरोधातला विरोधकांचा प्रचार मतलबी आणि शेतकरी विरोधी आहे, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसला आपला जाहीरनामा व आपल्या काळात दिलेल्या परवानग्या सुध्दा आठवत नाहीत हे दुदैव आहे. हरियाणात काँग्रेसची सत्ता असताना २००७ मध्ये कंत्राटी शेतीला सुरुवात झाली. काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतमालंच्या विक्रीवरील बंधने हटविण्याचे आश्वासन दिले होते. आता हाच काँग्रेस पक्ष केवळ राजकीय विरोधासाठी या विधेयकांना विरोध करतो आहे. शेतकऱ्यांनों या अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहनही उपाध्ये यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER