कॉंग्रेसजनांनाही शरद पवारांचे नेतृत्त्व मान्य ! राष्ट्रवादी प्रवेशाचे त्या 18 नगरसेवकांनी सांगितले कारण

Congress-NCP

मुंबई : भिवंडीत स्थानिक कॉंग्रेस (Congress) राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहेत. हा वाद अखेर पक्षबदलापर्यंत येऊन ठेपला आणि कॉंग्रेसच्या तब्बल 18 नगरसेवकांनी एकाचवेळी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. महापौर निवडणुकीपासूनच हे नगरसेवक कॉंग्रेसपासून दूर झाले होते. अखेर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने शहरात काँग्रेसची ताकद कमी झाली असून राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.

या १८ नगरसेवकांनी गुरुवारी मनपाचे उपमहापौर इम्रान खान यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद ओयोजित केली होती. या पत्रपरिषदेत त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचे कारण सांगितले. भिवंडी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राजकारणाला वैतागून आपण राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असल्याची कबुली या १८ नगरसेवकांनी दिली आहे.

काँग्रेसचे माजी नगरसेवक जावेद दळवी यांनी त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत केवळ भाजप व कोणार्कच्या नगरसेवकांना मदत केली मात्र आम्ही काँग्रेसमध्ये सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतानाही आमच्या वार्डात साधे गटर , नाले व रस्त्यांची कामे देखील झाली नाहीत. आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या वार्डातील निधीसाठी मागणी करत होतो त्यात्या वेळी आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने आमच्या प्रभागांमध्ये विकासकामे झाली नसल्याने आमच्या विरोधात स्थानिक नागरिकांचा रोष वाढत होता. त्यामुळेच आपण काल मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असल्याची कबुली देखील या नगरसेवकांनी या पत्रकार परिषदेत दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER