कॉंग्रेसचा न्याय : राज्यातील २९ हजार कुटुंबांना प्रत्येकी दिवसाला २०० रुपयांचे वाटप

Jaideep Shinde-Congress

मुंबई : आज कॉंग्रेस नेते, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतिदिन आहे. याप्रीत्यर्थ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात युवक कॉंग्रेसकडून २९ हजार कुटुंबांना प्रत्येकी २००  रुपयांचे वाटप करण्यात येत आहे.

युवक काँग्रेसकडून राज्यात ‘न्याय योजने’ची प्रतीकात्मक अंमलबजावणी करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देशभरात ही योजना लाँच केली होती.

या अंतर्गत युवक काँग्रेस राज्यातील २९ हजार कुटुंबीयांना प्रत्येकी २०० रुपये देण्यात येणार आहे. न्याय योजनेच्या महिन्याच्या सहा  हजार रुपयांच्या योजनेचं प्रतीकात्मक वाटप आज युवक काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

महिन्याला सहा  हजार म्हणजेच दिवसाला २०० रुपये अशी प्रतीकात्मक मदत युवक काँग्रेसने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला