कृषी कायद्यांना काँग्रेस रस्त्यावर उतरून विरोध करणार : एच. के. पाटील

Shetkati Bachao Rally

कोल्हापूर : केंद्र सरकारने तीन शेतकरी कायदे आणले आहेत. ते शेतकरी विरोधी असून बड्या उद्योजकांना धार्जिणे आहेत. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत, कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरुन संपूर्ण देशभर या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्राचे प्रभारी कर्नाटकचे माजी मंत्री एच. के. पाटील यांनी जाहीर केले. राज्यसभेत बहुमत नसताना केवळ गोंधळाच्या परिस्थितीत हे कायदे मंजूर करून संसदीय मर्यादांचे उल्लंघन केले आहे, अशी घणाघाती टीका पाटील (H K. Patil) यांनी केली.

कॉंग्रेसच्या “शेतकरी बचाओ रॅली’त (व्हर्चुअल) (Shetkari Bacchao Rally)ते संगमनेर येथून बोलत होते. दरम्यान, कोल्हापूर येथून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील, संपर्कप्रमुख देविदास भन्साळी, महापौर निलोफर आजरेकर, आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जिल्हापरिषद अध्यक्ष बजरंग पाटील, नगरसेवक शशांक बावचकर, सचिन चव्हाण आदींनी रॅलीत सहभाग घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER