फोडाफोडीची भीती; काँग्रेसच्या आमदारांचे बंडल जयपूरला हलवले

Congress

राज्यात कोणत्याही पक्षाकडे एकट्याने सरकार स्थापन करण्याइतके बहुमत नाही आणि युती करून निवडणूक लढलेल्या भाजप – शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला तिढा सुटत नाही. दरम्यान, बहुमतासाठीच्या सौदेबाजीत आपले आमदार फुटू शकतात या भीतीने काँग्रेसने आपले आमदार जयपूरला हलवले आहेत.


मुंबई : राज्यात कोणत्याही पक्षाकडे एकट्याने सरकार स्थापन करण्याइतके बहुमत नाही आणि युती करून निवडणूक लढलेल्या भाजप – शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला तिढा सुटत नाही. दरम्यान, बहुमतासाठीच्या सौदेबाजीत आपले आमदार फुटू शकतात या भीतीने काँग्रेसने आपले आमदार जयपूरला हलवले आहेत.

ही बातमी पण वाचा:- शरद पवार शेतकऱ्यांचं दु:ख जाणणारे चांगले नेते’ ; चंद्रकांत पाटलांकडून कौतुक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल दावा केला होता की, बहुमत जुळवण्यासाठी भाजप आमच्या आमदारांशी संपर्क करत आहे. या दाव्यात सत्य किती ते माहीत नाही; पण यातून काँग्रेसला त्यांचे आमदार फुटण्याची भीती आहे हे मात्र लक्षात येते. त्यामुळे काँग्रेसने त्यांचे आमदार आपल्या पक्षाचे सरकार असलेल्या राजस्थानमधील जयपूरला हलवले आहेत.

मातोश्रीवर १८ फेब्रुवारी २०१९ ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची  बैठक झाली होती. त्या बैठकीत फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षं वाटून देण्याचे आश्वासन भाजपने शिवसेनेला दिले होते, असा दावा शिवसेना करत आहे व निवडणुकीत भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्यानंतरही, त्या आधारे शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी रुसून  बसली आहे. भाजपकडे १०५ आमदार आहेत. सर्वांत  मोठा पक्ष आहे. त्यामुळे ते सत्ता स्थापन करण्याचा दावा करू  शकतात. मात्र, बहुमतासाठी आमदारांची संख्या कमी आहे.