महाविकास आघाडीशी काँग्रेसची फारकत, ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार

Mahavikas Aghadi - Thane Municipal Corporation

ठाणे : शहर काँग्रेसची (Congress) जम्बो कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. येत्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वत्र उमेदवार उभे करण्यात येणार असून सर्व पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच प्रत्येक प्रभागात लोकोपयोगी कार्यक्रमापाठोपाठ नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण (Vikrant Chavan) यांनी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केले.

नवनिर्वाचित कार्यकारिणी बैठक मुंग्रा येथे झाली. ठाणे (Thane) शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोज शिंदे, अनिल साळवी, प्रदेश काँग्रेस सदस्य सुखदेव घोलप, जे.पी. यादव, अनिस कुरेशी, महिला काँग्रेस अध्यक्षा शिल्पा सोनोने, युवक काँग्रेस अध्यक्ष आशीष गिरी, एन.एस.यू.आय. अध्यक्ष आकाश राहाटे आदी उपस्थित होते. महापालिका निवडणूक नजरेसमोर ठेवून आपली कार्यकारिणी कार्यरत राहील, असे चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिले. सध्या तीनच नगरसेवक असलेल्या काँग्रेसने राज्यातील विद्यमान महाविकास आघाडीशी फारकत घेऊन आगामी महापालिका स्वबळावर लढण्याचा नारा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER