कॉंग्रेस मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढणार !

BMC

मुंबई : राज्यातील सर्वात मोठी महापालिका (mumbai municipal corporation election 2022)म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. त्यातच सर्व निवडणुका एकत्रित लढू म्हणणा-या महाविकास आघाडीत आताच मतभेद दिसून येत आहेत. कॉंग्रेसमधील हालचालींना वेग आला असून दिल्लीत राज्य नेतृत्त्वाबद्दलची कलबतं चालली. त्यानंतर आता मुंबई महापलिका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवनियुक्त मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस पक्ष मुंबईतील 227 वार्डाची तयारी पूर्ण करत असून निवडणूक स्वतंत्र लढवावी अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, याच वेळी राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वेगळी भूमिका मांडली आहे.

‘महाविकास आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्रित आहेत. महापालिका निवडणुकीला अजून वेळ आहे. भाई जगताप अग्रेसर नेते आहेत. संघटनात्मक काम चांगले आहे. काँग्रेस पक्ष सर्व वार्डाची तयारी करत असला तरी एकत्रित निवडणूक म्हणून काँग्रेस,शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक लढविण्यासबाबत आता लगेच निर्णय घेता येणार नाही. भविष्यात निर्णय घेऊ अशी सावध भूमिका थोरात यांनी घेतली आहे.

नवनियुक्त जगताप आणि प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्यातील मुंबई काँग्रेसच्या निवडणूक बाबतचे भूमिका एकमेकांच्या विरोधात असल्याने दोन्ही नेते यावरून वेगळ्या भूमिका मांडत आहे अशी चर्चा आता रंगली आहे.

ख्रिसमस आणि New Year Celebration साठी महापालिका लवकरच नवीन नियमावली?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रम राबवावे यासाठी पत्र पाठवले होते. त्यानुसार राज्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेसचे नेते नितीन राऊत, वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आदी नेते उपस्थितीत होते. या पत्रकामध्ये दलित, आदिवासी विकास योजनेसाठी निधी देण्यात यावा, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER