राज्यात २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल : नाना पटोले

Nana Patole

मुंबई : उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. या भागातून पुन्हा लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून काँग्रेस २०२४ मध्ये स्वबळावर सत्तेत येईल, यासाठी काम करण्याचे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे. काँग्रेस पक्ष हा देशाला आणि सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. भाजपने खोटी स्वप्ने दाखवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम केले. लोकांचा आता भाजपवर विश्वास नाही. काँग्रेसचा विचार देशाच्या हिताचा आहे. आज धुळे जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा मानाने फडकत राहील, असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला.

नाना पटोले म्हणाले की, “काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून २०२४मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल, यासाठी काम करा.” तसेच त्यांनी शरद पाटील यांच्यासह पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे काँग्रेस परिवारात स्वागत केले.

नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल उत्तम : थोरात
यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की, “नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल उत्तम सुरू आहे. गतवैभव प्राप्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नात प्रत्येक जण त्यांच्यासोबत आहे. भाजपला कंटाळून अनेक जण काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. आजचा पक्षप्रवेश पाहता धुळे जिल्हा पुन्हा एकदा कॉंग्रेसचा पक्ष होऊ लागला आहे.” असे थोरात म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button