
मुंबई :- काँग्रेसला (Congress) राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्याचा निर्धार करणाऱ्या नाना पटोले (Nana Patole) यांनी जाहीर केला. यावर भाजपाचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टोमणा मारला – होय, काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकतो; पण तो लबाडी, भ्रष्टाचार, फसवणूक या गोष्टींमध्ये!
मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. त्यांना नाना पटोले यांच्या निर्धाराविषयी विचारण्यात आले. त्यावर शेलार यांनी उल्लेखित टोमणा मारला. ते म्हणालेत, काँग्रेस किती नंबरी आहे हे जनतेने पाहिले आहे. अशा नंबरी काँग्रेसला अजून नंबरी करण्याचे काम नवे अध्यक्ष करणार असतील तर वर्षानुवर्षे काँग्रेसने चालवलेला धोकेबाजी, भ्रष्टाचार, लबाडीच्या कार्यक्रमात त्यांना वरचा नंबर नक्की मिळेल.
ही बातमी पण वाचा : काँग्रेस-राष्ट्रवादीला अधिक जागा सोडण्यास शिवसेनेचा नकार, मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना नेत्यांची स्वबळाची मागणी
भाजपाची महापालिकेसाठी मोर्चेबांधणी
मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांची ‘युवा वॉरियर्स’ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ओबीसींना आकर्षित करण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांत ‘ओबीसी हक्क परिषदां’चे आयोजन करणार आहे, असे ते म्हणालेत.
काँग्रेसला लबाडीचा नंबर नक्की मिळेल..@BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/Y0KkI5TVlQ
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 9, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला