‘सावरकरांना भारतरत्न’ या शिवसेनेच्या मागणीला काँग्रेसचा विरोधच : वडेट्टीवार

Sawarkar And Vijay Waddetiwar

नागपूर : सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला काँग्रेसचा विरोधच आहे. सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही. सावरकरांबाबतची भूमिका संजय राऊत यांनाच लखलाभ, अशी भूमिका काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज रविवारी मांडली.

‘नाईट लाईफ’ की ‘नाईट क्लब’? किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारला सवाल

एका खाजगी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना समज द्यावी. संजय राऊत यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्याबाबत येत्या काळात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग करीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापन केली. मात्र, त्यानंतरही शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक भूमिका विरोधात येत आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावरही संघर्ष बघायला मिळतो आहे. यापूर्वीही काँग्रेस नेत्यांनी सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यास विरोध केला होता, हे येथे उल्लेखनीय.