विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि राहिल : आ. नाना पटोले

Nana Patole

vमुंबई : काँग्रेस (Congress) अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी (Sonia Gandhi) व राहुलजी गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येकाला आपल्या पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पक्षश्रेष्ठीने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक 1 चा पक्ष बनवू असे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारच्या हुकुमशाही वृत्तीमुळे देशात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ७० दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून देशाची राजधानी असणा-या दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केंद्रातील सरकार शेतक-यांना देशद्रोही, खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. आता या देशात भाजप विरूद्ध शेतकरी अशी लढाई सुरु झाली असून काँग्रेस पक्ष या लढाईत शेतक-यांसोबत आहे. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना महाराष्ट्रातूनही मोठे बळ देऊ असे सांगून पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत बोलले ही नवीन बातमी आहे. कारण पंतप्रधान झाल्यापासून ते संसदेऐवजी निवडणूक प्रचारांच्या सभांमध्येच बोलतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे उदाहरण देतात, मग जीएसटीचा जो कायदा मनमोहन सिंह आणू पाहत होते त्यात बदल करून त्याला मोदींनी गब्बरसिंह टॅक्स का बनवले? या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एक काळ होता अंडरवर्ल्डचे लोक दबाव आणून सेलिब्रिटींना वागायला लावतात अशी चर्चा होती पण आता तर केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे विचलीत करण्यासाठी सेलिब्रिटींचा वापर करत आहे. सरकारही अंडरवर्ल्ड प्रमाणे वागत आहे हे गंभीर आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि काँग्रेसकडेच राहिल काँग्रेस पक्षश्रेष्ठी कोणाला अध्यक्ष करायचे याचा निर्णय घेतील असे नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस असा शुन्य आहे ज्याच्या जवळ विश्वाची निर्मिती करण्याची क्षमता आहे असं सांगत ते म्हणाले की, गत काळात काँग्रेसकडून काही चुका झाल्या, पक्षाचा सामान्यांशी संपर्क कमी झाला, त्याचा परिणाम पक्ष जनतेपासून दूर होत गेला. पण चढ उतार असणं हे जसं मानवी जीवनाचा भाग आहे, ते पक्षाच्या बाबतीतही लागू होतंय. येत्या काळात जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळून काम करणार आणि 2024 सालच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनवणार असा विश्वास आहे.

सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्वीटवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, पूर्वीच्या काळी मुंबईमधील सेलिब्रेटी हे अंडरवर्ल्डच्या दबावाखाली असायचे. आताचे मोदी सरकार त्या सेलिब्रेटींनी तशा प्रकारची वागणूक देतंय का असा प्रश्न पडतोय. आता शेतकरी आंदोलनात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय, ते इतके दिवस आंदोलन करत आहेत. त्यांच्या विरोधात हे सेलिब्रेटी बोलतात हे चुकीचं आहे. सेलिब्रेटींनी त्यांच्या चाकोरीत राहणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER