दारू वाटा, पण शेतकरी आंदोलन सुरू ठेवा! काँग्रेसच्या विद्यादेवींचे आवाहन

नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) पैसे किंवा दारू पुरवून मदत करा, पण हे आंदोलन सुरू ठेवा, असे आवाहन काँग्रेसच्या नेत्या विद्यादेवी (Vidya Devi) यांनी केले. त्या काँग्रेसच्या (Congress) जिल्हा कार्यकारिणी बैठकीत बोलत होत्या. बैठकीत आमदार सुभाष गंगोली यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

काँग्रेसने आश्वासन दिलेल्या कृषी सुधारणाच या कायद्यात केल्या आहेत, असा केंद्र सरकारचा दावा आहे. आता काँग्रेस राजकारण म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देऊन ते चिघळवते आहे, असा आरोप सरकारने केला आहे, हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.

विद्यादेवी भाषणात म्हणाल्या – काँग्रेस जेव्हापासून निवडणूक हारली आहे, तेव्हापासून पक्षाचे अस्तित्व संपले आहे. आता हे आंदोलन कसेतरी उभे राहिले असून आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ते पुढे घेऊन जायचे आहे. शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांची मदत करा, ती पैशाने असो किंवा दारूने. शेतकऱ्यांसाठी दारूही दान करू शकता. शक्य होईल तितके सहकार्य करून हे आंदोलन पुढे घेऊन जा.

Source:-Daily Hunt

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER