भाई जगतापांच्या नेतृत्वात मुंबई काँग्रेसला उभारी

Bhai Jagtap

मुंबई : भाई जगताप (Bhai Jagtap) मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर मुंबईत काँग्रेस आक्रमक झाली आहे. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच जगताप यांनी मनपाची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आणि त्याची तयारीही सुरू केली. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुबंईत आल्या तेव्हा त्यांचा समोर इंधन दरवाडीच्या विरोधात मोर्चा काढला, या मोर्चात चांगली गर्दीही जमली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील ‘राजगृह’ या निवासस्थानावरून मोर्चा निघाला. हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. राज्याच्या मंत्री वर्षा गायकवाड, चरणजीत सप्रा, नसीम खान आणि सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेतेही उपस्थित होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हे चांगले लक्षण आहे.

अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच भाईंनी स्वबळाची घोषणा करून महाविकास आघाडीला पहिला झटका दिला. त्यानंतर आझाद मैदानात डाव्या संघटनांनी पुकारलेल्या शेतकरी मेळाव्यात जाऊन त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER