पदोन्नतीच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारमध्ये मतभेद ; ‘या’ काँग्रेस मंत्र्याचा आघाडीला इशारा

nitin raut and uddhav tahckeray

मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये वादंग पेटले आहे . मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी ठाकरे सरकारने (Thackeray Govt) पदोन्नतीत दिलं जाणारं आरक्षण मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मागासवर्गिय समाजानेही आक्रमक पावित्रा घेतला आहे .

ही बातमी पण वाचा:- मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणाला; चुरशीच्या लढतीत फडणवीसांची ठाकरेंवर मात

काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनीही पदोन्नीतील आरक्षणावरुन आपली भूमिका स्पष्ट केली . नितीन राऊत यांनी यासंदर्भात प्रसिद्ध पत्रक जाहीर केले . 2 दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या विषयावर बैठक न लावल्यास मंत्रिमंडळ बैठकीत विषय उपस्थित करणार असल्याचे राऊतांनी सांगितले आहे.

काँग्रेस नेहमीच मागासवर्गियांच्या सोबत राहिली आहे, मात्र मागासवर्गीयांसोबत जे सध्या चालू आहे ते आम्ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या कानावर घालू, असं राऊत म्हणाले. मंत्रीमंडळातून बाहेर पडायचे की नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेस पक्षाच्या हायकमांडचा आहे. मात्र काँग्रेस पक्षाला गृहित धरू नका, आम्ही तुमचे नोकरदार नाहीत, असा इशारा त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button