काँग्रेस करणार ५ लाख ‘सोशल मीडिया वॉरिअर्स’ची भरती

Congress

दिल्ली : लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीपासून प्रचाराच तंत्र बदलले आहे. प्रचारात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. सोशल नेटवर्कसाठी राजकीय पक्षांचे स्वतंत्र सेलच निर्माण झाले आहेत. काँग्रेस आपल्या सेलसाठी सुमारे पाच लाख ‘वॉरिअर्स’ भरती (5 lakh social media warriors) करणार आहे.

याबाबत एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, काँग्रेसच्या सोशल मीडिया पेजच काम करण्यासाठी काँग्रेस लवकरच पाच ‘वॉरिअर्स’ची भरती करणार आहे. या संदर्भात सोमवारी हेल्पलाईनची घोषणा होणार आहे. काँग्रेस २०१४ पासून सतत निवडणुकीत पराभूत होते आहे. मागील दोनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला.

देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ५० हजार पदाधिकारी निवडणार आहे. त्यांच्या मदतीसाठी साडेचार लाख कार्यकर्ते देणार आहे. सोशल मीडियाला समर्पित वेब पेजेससोबतच एक हेल्पलाईन नंबर सुरू केला जाणार आहे. या हेल्पलाईनवरून सोशल मीडिया टीममध्ये सहभागी होणाऱ्यांची माहिती संकलित करणार आहे. काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही भरती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केली जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER