काँग्रेस १५ जानेवारीला घालणार राजभवनांना घेराव

Randeep-surjewala

नवी दिल्ली :- महिन्याभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर अजून तोडगा निघालेला नाही. याचा निषेध म्हणून १५ जानेवारी रोजी शेतकरी अधिकार दिनानिमित्त काँग्रेस देशभरातील राजभवनांना (Raj Bhavan) घेराव घालणार आहे, अशी माहिती रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे सरकार इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनीपेक्षाही निष्ठूर आहे, अशी टीका करताना आता शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी देशातील शेतकरी ‘करो या मरो’ आंदोलन करतील, असे सुरजेवाला म्हणालेत.

मोदींना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही

संविधानाने कायदे बनिवण्याची आणि रद्द करण्याची जबाबदारी संसदेवर सोपवली आहे. कोर्टावर नाही. पण हे सरकार शेतकऱ्यांना कोर्टात जाण्यास सांगत आहे. मोदी सरकारला आपली जबाबदारी पेलता येत नाही. त्यामुळे त्यांना सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, अशी टीका त्यांनी केली.

आंदोलन

१५ जानेवारी रोजी प्रत्येक राज्यातील मुख्यालयातून शेतकरी अधिकार दिनाच्या निमित्त जनआंदोलन करण्यात येईल. धरणे धरण्यात येतील. त्यानंतर रॅली काढून राजभवनापर्यंत मार्च काढला जाईल. तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यासाठी राजभवनाला घेराव घालण्यात येईल, असे सुरजेवाला यांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय, प्रफुल पटेल यांनी टाळले बोलणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER