हाथरस घटनेच्या निषेधात काँग्रेस उद्या करणार सत्याग्रह

Congress

दिल्ली : हाथरस येथील युवतीवर झालेला बलात्कार आणि तिच्या अमानुष हत्येचा  निषेध करण्यासाठी काँग्रेस उद्या ५ ऑक्टोबरला सर्व राज्यांमध्ये जिल्हापातळीवर सत्याग्रह करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस व खा. के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.

वेणुगोपाल यांनी आरोप केला आहे की, उत्तरप्रदेशच्या सरकारने हे प्रकरण अतिशय बेजबाबदारपणे हाताळले. त्या मुलीला जिवंतपणी योग्य उपचार – मदत केली नाही. मृत्यूनंतर तिच्यावर कुटुंबाच्या संमतीशिवाय, अंत्यविधीचे संकेत गुंडाळून रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. १ ऑक्टोबरला काँग्रेसचे नेते राहुल  आणि प्रियंका गांधी हे पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी जात होते.  त्यावेळी त्यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अडवले.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. राहुल व प्रियंका (Priyanka Gandhi) यांच्यासोबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केली. उत्तरप्रदेश सरकारच्या दबावाला बळी न पडत ३ ऑक्टोबरला राहुल- प्रियंका हाथरसला गेलेत. पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन केले. त्यांना आश्वासन दिले की, त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत लढत राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER