शरद पवार दिलदार राजकारणी : सुशीलकुमार शिंदे

Sharad Pawar - Sushilkumar Shinde

सोलापूर :काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे कौतुक केले आहे . १९७८ साली आम्ही सगळे एकत्र होतो. म्हणजे त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस वगैरे असं काही नव्हतं. काँग्रेस म्हणून आम्ही सगळे एकत्रित होतो. यावेळी मला पवारसाहेबांचं प्रचंड मार्गदर्शन लाभलं. पवारसाहेबांनीच मला राजकारणात आणलं.

माझ्या राजकीय आयुष्यात साहेबांचा मोठा वाटा आहे, अशी भावना सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. शरद पवारांनी मला तिकीट दिले. तसंच तिकीट दिल्यानंतर मला निवडणुकीला २० हजार रुपयेदेखील दिले होते. उरलेले ४ हजार रुपये मी त्यांना परत दिले होते. असे पवार दिलदार राजकारणी आहेत. शरद पवार यांच्यासारखा नेता मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे, असे सरतेशेवटी शिंदे म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रहमान अंतुले यांनी मला मंत्रिमंडळात घेतलं नाही; पण त्याच वेळी शरद पवारसाहेबांनी (Sharad pawar) मला शेतीचे वेड लावले.

अगदी सोलापुरात (Solapur) मला शेती घ्यायला लावली. एखाद्याला पुढे रेटायचेच म्हटल्यावर पवारसाहेबांचा हात यात कुणीच धरू शकत नाही, अशा भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांनी बोलून दाखवल्या. सोलापुरात आज एक विशेष कृषी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर होते.

दोन्ही नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या राजकीय जडणघडणीत पवारांचा वाटा किती मोठा राहिलेला आहे, यासंदर्भात सांगितले. शरद पवारांनी मला शेतीचं वेड लावलं. मला शेती घ्यायला लावली. शेतीवर प्रेम करायला शिकवलं. आधी माझ्याकडे १२ एकर शेती होती. नंतर ती वाढवली. आता माझ्याकडे ३४ एकर शेती आहे, असं त्यांनी सांगितलं. ‘माझ्यावर पवारसाहेबांचं प्रचंड प्रेम आहे. आम्हा सगळ्यांना शरद पवार यांच्यासारखा नेता मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे. पवारसाहेबांनी एकदा का मनावर घेतले की ते बरोबर कार्यक्रम करतात, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER