कृषी कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष : एच. के.पाटील

H.K. Patil

कोल्हापूर : संविधान पायदळी तुडवून केंद्रातील भाजपचे (BJP) सरकार नव नवीन कायदे करत आहे. अशाच प्रकारे केलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभर शेतकरी आक्रोष करत आहे. खोट बोलून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा (Modi Government) खरा चेहरा आता पुढे येत आहे. कामगार आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तिन्ही कायदे मागे घेतल्याशिवाय काँग्रेस (Congress) शांत बसणार नाही. काँग्रेसचा यापुढेही तिव्र संघर्ष सुरु राहिल असा इशारा काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (H.K Patil) यांनी गुरूवारी दिला.

कृषी कायद्यांविरोधात कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे ट्रॅक्टर रॅली काढून विरोध करण्यात आला. निर्माण चौकातून सुरू झालेल्या यारॅलीत एक हजार ट्रॅक्टर सहभागी झाल्याचा दावा काँग्रेसने केला. दसरा चौकात रॅलीच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष आ. पी. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

एच. के. पाटील म्हणाले, नोटाबंदी आणि जीएसटी प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना (Corona) काळात जाहीर केलेले २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज खोटे आहे. यातील एक रुपयांही सर्वसामान्यांपर्यंत पोहचला नाही. वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले मात्र याउलट दरवर्षी लाखो उद्योग बंद पडत आहेत. कोट्यावधी बेरोजगार झाले. केंद्र सरकारचा खोटेपणा आता जनतेला समजू लागला आहे. खोट पॅकेज नको आत्मसन्मानाने जगू द्या या मागणीसाठी देशभर शेतकरी आणि सर्वसामान्य जनता आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER