संबित पात्रांबाबत काँग्रेसच्या प्रवक्त्याने वापरले अपशब्द

Supriya Shrinet on Sambit Patra

भारतीय जनता पार्टीच्या (BJP) सात वर्षांच्या राजवटीबाबत सुरू असलेल्या लाईव्ह शोमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांच्याबाबत काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत (Supriya Shrinet) यांनी अपशब्द वापरले!

काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपावर बेरोजगारी, कोरोना, गरिबी यांसारख्या मुद्द्यांवरुन टीका केली. भाजपाने देशातील मोठ्या संस्थांचेही नुकसाने केले. मोदी सरकार चीनचे नाव घ्यायलाही घाबरते, असा टोमणा मारला.

चीन आणि डोकलाम मुद्द्यांवरुन वादविवाद सुरू झाला. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी २००८ ला चीनला जाऊन करारावर सह्या केल्याची आठवण संबित पात्रा यांनी करुन दिली. त्यावेळी, किती रुपयाची घेवाण-देवाण झाली? असा प्रश्न केला. यावर सुप्रिया संतापल्या आणि संबित पात्रा जोकरपंती करतात, असे म्हटले. राहुल गांधींना हटवा, असे संबित पात्रा यांनी म्हटले. त्यावर, श्रीनेत यांचा तोल गेला आणि त्या संबित पात्रा यांना गटारातला किडा म्हणालात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button