काँग्रेसचा ‘हात’ सोडत अभिनेत्री खुशबू यांचा भाजपात प्रवेश

मुंबई : तामिळनाडूतील काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर (khushboo sundar)यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. सोमवारी खुशबू यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला होता.

राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून खुशबू सुंदर यांच्या भाजपा प्रवेशाविषयी चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या होत्या. याचदरम्यान त्या रविवारी दिल्लीत गेल्या आणि त्यानंतर त्यांनी सोमवारी सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. विशेष म्हणजे या राजीनाम्यासोबत त्यांनी एक पत्रदेखील सोनिया गांधी यांना दिलं असून त्यात पक्षातील काही वरिष्ठांवर आरोप केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER