काँग्रेस बुडते जहाज, गुजरात पोटनिवडणुकांचे निकाल ट्रेलर – विजय रूपाणींचा टोमणा

Vijay Rupani

गांधीनगर : काँग्रेस हे बुडते जहाज आहे, त्या पक्षाचा लोकांशी संपर्क राहिला नाही. सर्वत्र त्यांच्या विरोधात निकाल आहेत. तो नेतृत्व नसलेला पक्ष आहे. गुजरातमधील पोट निवडणुकांचे निकाल हे आगामी काळातील निवडणुकांचा ट्रेलर आहे. असा टोमणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (CM Vijay Rupani) यांनी काँग्रेसला मारला. गुजरातमधील पोटनिवडणुकीत सर्व आठ जागांवर भाजपा विजयी आघाडीवर आहे.

आगामी पंचायत निवडणुका व २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा उत्कृष्ट प्रदर्शन करेल, असा विश्वासही रुपाणी यांनी व्यक्त केला. काँग्रेस समाजात अफवा पसरवून निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न करते. मात्र गुजरातच्या जनतेने त्यांना यशस्वी होऊ दिल नाही. असे रुपाणी म्हणालेत.

उपमुख्यमंत्री नितीन पटेल याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणालेत, जनतेने सरकारच्या कामावर विश्वास दाखवत, पोटनिवडणुकीत सर्व आठ जागांवर विजयी होण्यासाठी कौल दिला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच भाजपाचा विजय निश्चित झाला होता. गुजरातमध्ये काँग्रेसचे अस्तित्व संकटात आहे. काँग्रेसचे नेते चुकीची वक्तव्य करून सरकार व भाजपा नेत्यांना बदनामा करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होते. केंद्रातील मोदी सरकार व गुजरातमधील रुपाणी सरकार जनतेच्या हितासाठी काम करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER