‘काँग्रेसने मोठेपणा दाखवून पवारांना युपीएचे नेतृत्व करु द्यावे, देशाचं चित्र बदलेल’ – संजय राऊत

Sanjay Raut - Sharad Pawar - Sonia Gandhi

औरंगाबाद : मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नेहमी म्हणत असतो तुम्ही दिल्लीला जायला हवे. देशात सध्या नेते दिसत नाही. राहुल गांधी (Rahul Gandhi) एक प्रामाणिक नेता आहे. सत्तेची ताकद आणि पैसा राहुल गांधींचं खच्चीकरण करण्यासाठी वापरला जात आहे. राहुल गांधींपेक्षा अनेक बोगस लोक त्याठिकाणी बसलेले आहेत. काँग्रेसचे (Congress) नेते फोडले जात आहे. काँग्रेस नेत्यांनी गांधी आणि काँग्रेसच्या नावावर कोट्यावधी रुपये जमवले. त्यामुळे ते घाबरत आहेत. सध्या एनडीए अस्तित्वात दिसत नाही, तशी यूपीएही नाही. यूपीएचं (UPA) पुनर्गठन झालं पहिजे. त्याचे नेतृत्व शरद पवार (Sharad Pawar) यांनी करावे. त्यामध्ये सर्व पक्ष येतील, असा दावा शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ते औरंगाबादमधील जय भीम फेस्टिव्हलमध्ये आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. प्रसिद्ध राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी ही मुलाखत घेतली.

यावेळी त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यावर अप्रत्यक्षपणे मिस्कील टीका केली. काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दुकानं लावतात. तसेच त्यांच्याच नावाने संसदेच्या सभागृहात पोहचतात, असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे आठवलेंवर मिस्कील टीका केली.

संजय राऊत म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला मार्ग दाखवला. काही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दुकानं थाटून आपली राजकीय पोळी भाजतात. त्यांच्या नावानं संसदेच्या सभागृहात पोहचतात. देशात दोनच दैवतं आहेत, एक बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. आज देशात विचार आणि माणूस संपवण्याचे प्रयत्न केले जातं आहे. त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील. संविधानावर हल्ले होताना दिसून येत आहे. स्वातंत्र्य संपत चालले आहे. आता जनता शांत आहे, मात्र 2024 ला जनतेच्या भावनांचा स्फोट झालेला दिसून पडेल. जगात कोणीही सत्तेचा अमर पट्टा बांधून आला आहे. सद्दाम हुसेन, ट्रम्प पण हरले.

असंही संजय राऊत यांनी आपल्या मुलाखतीत नमूद केलं. तसेच राज्यकर्ता दिलदार असला पाहिजे असंही ते म्हणाले.

संजय राऊत यांनी यावेळी ईडीवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ईडीचे (ED) काम बेहिशोबी पैसा बाहेर काढणे आहे. काळा पैसा बाहेर काढू असं भाजप म्हणालं होतं. 7 वर्षात काय केलं? मोदींचे माझे चांगले संबंध आहेत. महाराष्ट्र सरकार गेल्याने माझ्या मागे ईडी लावली. बायकांना नोटीस देता आम्हाला द्याना.

संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले, आम्ही जनतेचा आवाज ऐकतो. खरंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती, पण तरीही राजीनामा घेतला. यात काळात मोहन देलकर या खासदारांनी आत्महत्या केली. त्यांना वाटलं असेल मुंबईत आत्महत्या केल्यानं त्याचा तपास होईल. त्यांच्या आत्महत्येमागे गुढ आहे. त्यांच्या आत्महत्येला आम्ही न्याय देऊ. त्यांचा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास होता. त्यामध्ये ज्या लोकांची नावं आहेत त्यामध्ये भाजपच्या लोकांची नावं आहेत.

केंद्रात दोन-चार लोकं सोडले तर बाकी दिल्ली मूक आणि बधीर आहे. ज्या पक्षाचे सरकार आहे त्यांच्या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही. दिल्ली आता मुडद्यांचं शहर झालंय, असाही प्रहार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली.

मुलाखतीतील इतर महत्त्वाचे मुद्दे

सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. एक ही पक्ष किंवा आमदार कुठे जाणार नाही. राजपाल कोश्यारी यांना वाटतं त्यांच्या विचाराचं सरकार यावं. त्यांनी पहाटे आणलं होतं. सरकारने राज्यपाल नियुक्तीसाठी 12 नावं पाठवली आहेत ती अद्याप मंजूर नाही. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने एका स्टेडियमला आपलं नाव देण्याचं कृत्य करायला नको होतं. काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. त्यांनी जर त्याग केला तर देशातील चित्र बदलेल.दिल्लीत नवी संसद उभी राहते. त्या संसदेत नेहरू ते मोदीपर्यंतचे पाय लागले. ती संसद बंद केली जाईल. या देशात सध्या काहीही होऊ शकतं, असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER