‘औरंगाबाद नामांतरामुळे मुस्लीम मते गमावण्याची भीती काँग्रेसने बाळगू नये’ – चंद्रकांत खैरे

Balasaheb Thorat - Chandrakant Khaire

मुंबई : औरंगजेब हा अत्यंत क्रूर राजा होता. मुस्लीम समाजातही त्याच्याविषयी प्रेम नाही. त्यामुळे औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर संभाजीनगर (Sambhaji Nagar) झाल्यास आपण मुस्लीम मतेगमावून बसू, ही भीती काँग्रेस पक्षाने मनातून काढून टाकावी, औरंगाबादचे नामांतर हा अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे याला विरोध करु नये, असा सल्ला शिवसेना (Shiv Sena) नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी काँग्रेसला (Congress) केले आहे.

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतराच्या मुद्द्यावरुन ‘सामना’तील रोखठोक या सदरातून काँग्रेस पक्षावर निशाणा साधण्यात आला होता. या टीकेला बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रक काढून प्रत्युत्तर दिले. नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत, असा मजकूर या पत्रकात लिहला होता.

या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना सल्ला दिला. खैरे म्हणाले की, बाळासाहेब थोरात हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, औरंगजेब हा एक क्रूर राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम वाटत नाही. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतरामुळे मुस्लीम मते गमावण्याची भीती काँग्रेसने बाळगू नये. बाळासाहेब थोरात यांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजित पवार (Ajit Pawar) आणि बाळासाहेब थोरात एकत्र बसून या सगळ्यातून योग्य ते मार्ग काढतील. मात्र, औरंगाबादचे नामांतर होणार म्हणजे होणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे. आगामी काळात काँग्रेस नामांतराला विरोध करणार नाही, असा विश्वास मला वाटत असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER