मुंबई मनपा निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढावी- भाई जगताप

Bhai Jagtap

मुंबई : काँग्रेसने मुंबई मनपाची निवडणूक स्वबळावर लढावी, असे मत मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केली आहे. मुंबई काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कॅप्टन म्हणून माझे हे मत आहे. ते म्हणालेत की, मुंबई महापालिकेत एक वेळी काँग्रेसचे ७५ नगरसेवक होते. मात्र मागील १० वर्षांमध्ये ही संख्या ३० ते ३५ वर आली आहे.

ही संख्या वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढणार. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी चंपाषष्ठीनिमित्त जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन घेतले. महापालिका निवडणुकांसाठी मिलिंद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, संजय निरुपम या सर्वांना सोबत घेऊ, असे जगताप म्हणालेत. आगामी महापालिका निवडणुकीत अभिनेता सुशांतसिंह मृत्युप्रकरण हा मुद्दा राहणार नाही.

भाजपाने मेट्रो कारशेडचा मुद्दा राजकीय बनवला असल्याची टीका जगताप यांनी केली. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महापालिका निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष काय करतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. काँग्रसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळाची घोषणा करून याबाबतच्या चर्चेला तोंड फोडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER