पुलवामा हल्ल्याबाबत पाकची कबुली : काँग्रेसने देशाची माफी मागावी; जावडेकरांची मागणी

Prakash Javdekar

नवी दिल्ली : पुलवामा (Pulwama) हल्ल्या पाकिस्ताननेच घडवून आणला, असे पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी कबूल केल्यानंतर, पुलवामा हल्ल्यावर संशय घेणाऱ्या काँग्रेसने (Congress) देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी केली.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. आयईडी स्फोटकांनी भरलेली कार जवानांच्या गाडीला येऊन धडकली होती.

‘पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या मागे त्यांचा हात असल्याचे पाकिस्तानने स्वीकारले आहे. आता काँग्रेस आणि इतर पक्षांनी देशाची माफी मागावी,’ असे ट्विट प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून भाजपाच्या अनेक नेत्यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. पुलवामा हल्ल्यात षड्यंत्र असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

भारताच्या भीतीमुळे झाली अभिनंदनची सुटका’

फवाद चौधरी पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. त्यांनी संसदेत बोलताना ही कबुली दिली आहे. पाकिस्तानने भारतात घुसून हल्ला केल्या, असे ते म्हणालेत. तर, भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो या भीतीने भारतीय पायलट अभिनंदनला सोडले होते, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले होते, असा दावा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे खासदार अयाज सादिक यांनी संसदेत केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER