गुजरातमध्ये काँग्रेस-शिवसेना युती हा सोमय्यांचा जावई शोध : भाई जगताप

दापोली: गुजरात निवडणुकीत शिवसेनेची काँग्रेससोबत छुपी युती असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप म्हणजे जावई शोध असल्याचे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटले आहे.

गुजरात निवडणुकीत शिवसेना काँग्रेसची छुपी असल्याचं वक्तव्य भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केले होते. तसेच या निवडणुकांनंतर शिवसेनेची केविलवाणी परिस्थिती होईल असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी टीका केलीय.

गुजरातमध्ये शिवसेनेची ताकद नाही. असे सांगत आमचा सोशल इंजिनीअरिंग फॉर्म्यूला विजयी होईल, गुजरातमध्ये काँग्रेस 75 ते 80 सिट येतील, गुजरातमध्ये काँगेस ची सत्ता येऊ शकते असा दावा ही भाई जगताप यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे कॉंग्रेस मेळावा निमित्त आले होते. आता खरंच काँग्रेसचं सोशल इंजिनिअरिंग चालतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.