‘ड्रग्ज अ‍ॅडिक्ट’ला झाशीची राणी म्हणताना लाज वाटली नाही ? काँग्रेसचा भाजपाला टोमणा

मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात (Farmers protest) नक्षली आणि खलिस्तानींनी घुसखोरी केली, असा आरोप भाजपाच्या काही नेत्यांनी केला. यावरून काँग्रेसने (Congress) ट्विट करून भाजपाला (BJP) टोमणा मारला – देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वोतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलिसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, अभिनेत्री कंगना राणावतवर शिवसेनेने केलेल्या बेकायदा कारवाईविरोधात भाजपाने तिची बाजू घेतली होती. तसेच कंगनाने बरेच वेळा भाजपाच्या भूमिकांचे समर्थन केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांचे तिच्याशी शत्रुत्व आहे. काँग्रेसचे सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विट करून भाजपावर टीका केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER