राहुल गांधी, एक घाबरलेला विध्यार्थी, ओबामाच्या वक्तव्यावर काँग्रेसचे ‘नो कॉमेंट’

Barack Obama - Rahul Gandhi

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे व्यक्तित्व घाबरलेल्या विध्यार्थ्यासारखे आहे, या अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांच्या शेऱ्यावर काँग्रेसने पक्ष पातळीवर ‘नो कॉमेंट’ अशी भूमिका जाहीर केली आहे. मात्र, काँग्रेसच्या काही नेत्यांनी या संदर्भात ओबामा यांच्यावर टीका केली.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) म्हणाले – “मी प्रायोजित अजेंडा चालवणाऱ्या माध्यमांमधील काही अत्युत्तम मित्रांना नम्रपणे सांगू इच्छितो की, आम्ही पुस्तकातील व्यक्तीच्या दृष्टिकोनावर भाष्य करत नाही. पूर्वी, एखाद्या नेत्याला लोक आणि एजन्सीद्वारे “सायकोपैथ ” आणि “मास्टर डिव्हिडर” म्हटले जायचे. आम्ही अशा कधीही हे मान्य केले नाही.

कोणी पाच-दहा मिनिटाच्या सहवासात कोणाचे व्यक्तित्व कसे ओळखू शकतो ? कधी कधी यासाठी अनेक वर्ष लागतात. ओबामा यांनी राहुल गांधींवर अन्याय केला आहे, असे काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी म्हटले आहे.

आचार्य प्रमोद कृष्णन (Acharya Pramod Krishnam) म्हणाले – जे राहुल गांधी याना देव मानतात अशा काँग्रेसच्या करोडो कार्यकर्त्यांच्या भावना ओबामा यांनी दुखावल्या आहेत. राहुल गांधी कसे विद्यार्थी आहेत हे ओबामांना कसे कळले; ते राहुल यांच्या वर्गात होते का?

ओबामा यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) याची प्रशंसा केल्याने चिडलेले आचार्य प्रमोद कृष्णन ओबामांना ‘अंध भक्त’ म्हणाले !

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, ओबामा आणि राहुल यांची नोव्हेंबर २०१० व ओबामा यांनी भारताला भेट दिली तेव्हा २०१७ ला, भेट झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER