हाथरस प्रकरणी काँग्रेसचे कोल्हापुरात सत्याग्रह आंदोलन

Hathras case.jpg

कोल्हापूर : उत्तर प्रदेशातील (UP News) हाथरस (Hathras case) येथील दलित समाजातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या आणि योगी सरकारच्या मनमानी कारभारा विरोधात राज्यभर आज काँग्रेसच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे.आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आमदार पी.एन. पाटील, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, आदींच्या प्रमुख उपस्थितीत होते.

आमदार पी.एन. पाटील म्हणाले, हाथरस प्रकरणात केवळ जिल्हाधिकारी, पोलीसप्रमुख याचं निलंबन करणे हे नाटक आहे. त्याऐवजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा. काँग्रेस सरकारच्या काळात एखादी घटना घडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती, मात्र एवढी मोठी घटना घडूनही यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे करून देशात अराजकता माजविण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे खरंच साधू आहेत का? एका महिलेवर अत्याचार होत असताना ते गप्प का आहेत. असा सवाल उपस्थित करत, हाथरस घटनेस मुख्यमंत्री आदित्यनाथ हेच खरे जबाबदार आहेत. त्यामुळं हाथरस घटनेवरून जिल्हाधिकारी, पोलीसप्रमुख याचं निलंबन करण्याच नाटक थांबवून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार पी.एन. पाटील यांनी केली.

यावेळी काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख,उपमहापौर संजय मोहिते, महिला व बालकल्याण सभापती शोभा कवाळे, करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे, नगरसेवक तोफिक मुल्लाणी माजी नगरसेवक सचिन चव्हाण, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, शहराध्यक्षा संध्या घोटणे, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय पाटील, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे, गगनबावडा पंचायत समितीच्या सभापती संगीता पाटील, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER