शिवसेनेचे बोट धरून विधानसभेत आल्याचा सतेज पाटील यांना विसर; ‘स्वबळा’च्या आरोपांनंतर राजेश क्षीरसागर संतापले

rajesh-kshirsagar-Satej Patil

मुंबई :  कोल्हापुरात महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक (Kolhapur Municipal Corporation Election) स्वबळावर लढण्याची भूमिका आधी कोणी घेतली, यावरून काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) आणि शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांच्यात मतभेद सुरू  आहेत .

स्वबळाची भाषा सर्वांत  आधी राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना मेळाव्यात केल्याचा दावा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. क्षीरसागर यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. सतेज पाटील शिवसेना आणि राष्ट्रवादीला टेकओव्हर करायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला. “२०१४ मध्ये सतेज पाटील यांचा पराभव झाला. २०१७ मध्ये त्यांची विधानपरिषदेवर नेमणूक झाली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांनी बंटी पाटलांना मतदान केलं.

२०१९ च्या विधानसभेला त्यांनी धोका दिला. जेव्हा लागतं, तेव्हा निश्चितपणे शिवसेनेकडून घेतात. बंटी पाटील विधानसभेची पायरी चढण्याची पहिली वेळ होती, तेव्हा शिवसेनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. शिवसेनेचं बोट धरून ते विधानसभेत पोहचले. ते आज विसरले आहेत, अशी खंत क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER