काँग्रेसची पहिली मोठी घोषणा, कोल्हापूरची निवडणूक स्वबळावर लढण्याचे जाहीर

Satej Patil

कोल्हापूर : राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन केले. त्यानंतर इतर निवडणुकीमध्येही हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी मोठी घोषणा केली आहे.

कोल्हापूर महापालिकेची (Kolhapur municipal-election) निवडणूक महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार असल्याचंत्यांनी सांगितलं आहे. परंतु निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. कोल्हापूर महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी गर्दी होत आहे. आज सकाळीच त्यांच्या बावडा येथील निवासस्थानी अनेकांनी भेट घेऊन इच्छुक असल्याचे सांगितले आहे. यावेळी सतेज पाटील यांनी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार आहोत, मात्र निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे जाहीर केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER