
मुंबई : मुंबई पोलिसमधील एक कनिष्ठ अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक यांच्या अकल्पित कारनाम्यानी मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेची लक्तरं वेशीला टांगली जात आहेत. या प्रकरणी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली सरम्यात आली आहे. आता राज्यातील महाविकास आघाडीतील (Mahavikas aghadi) सहकारी पक्षाचे, म्हणजे काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी ‘सचिन वाझेचे (Sachin waze) झेंगट हे सत्ता प्रायोजित हफ्ता वसुली कांड आहे’ असा स्पष्ट आरोप करून शिवसेनेला सोलले आहे.
विरोधीपक्ष भारतीय जनता पार्टी याबाबत शिवसेनेचे नाव न घेता आडून याबाबत संकेत देत होती पण आज संजय निरुपम यांनी यात थेट शिवसेनेचे नाव घेऊन यात शिवसेनेला लपेटले आणि खळबळ उडवून दिली. आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते यावर राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना कमिश्नर परमबीर सिंह की जयजयकार कर रही है।
गृह मंत्री जो #NCP के हैं,कल बोले कि कमिश्नर ने गलती की थी।
ये विरोधाभासी बयान सरकार की इमेज और खराब करेगी।#वाजेकांड की जाँच से अबतक समझ में आया है कि यह सत्ता प्रायोजित हफ्ता वसूली कांड है।
इसके तार शिवसेना से जुड़े हैं क्या ?— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) March 19, 2021
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन या स्फोटकांचा कांड्या असलेली कार आढल्यानंतर जेव्हापासून या प्रकरणात सचिन वाझेचे नाव आले तेव्हापासून शिवसेना पूर्ण ताकदीने वाझेचा बचाव करत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर ‘विरोधक सचिन वाझेला ओसामा बिन लादेन ठरवण्याचा प्रयत्न करत आहे’ अशी विरोधकांवर आक्षेपार्ह टीका करत वाझेला ‘बिच्चारा’ ठरवण्याचा आश्चर्यजनक प्रयत्न केला होता. पण नंतर एनआयएच्या चौकशीत वाझेच्या करामती उघड झल्याने मुख्यमंत्र्यांचीही शोभा झाली. आता, या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा होईल, असे सांगून सरकारचे मंत्री आणि शिवसेना लज्जारक्षणाचा केविलवाणा प्रयत्न करत असताना निरुपम यांनी त्यांचे पूर्ण वस्त्रहरण केले आहे.
संजय निरुपम यांनी ट्विट केले आहे की – शिवसेना पोलीस कमिशनर परमबीर सिंह यांचा जयजयकार करते आहे. गृहमंत्री # NCP काळ म्हणालेत की कमिशनरने चूक केली. या विरोधाभासी वक्तव्यामुळे सरकारची इमेज आणखी खराब होणार आहे. # वाझेकांडाच्या आतापर्यंतच्या चौकशीत लक्षात आले आहे की, हे सत्ता प्रायोजित हप्ता वसुली कांड आहे. याचे धागे – दोरे शिवसेनेशी जुळले आहेत?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला