भाजपची भूमिका म्हणजे,’चित मैं जिता पट तू हारा’- सचिन सावंत

Sachin Sawant - BJP

मुंबई :- पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Case) प्रकरणात संजय राठोड (Sanjay Rathod) यांची गच्छंती झालेली असून, कालच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. काही दिवसांपासून भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी भूमिका घेत सरकारवर दबाव टाकला होता. याच दरम्यान चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. या कारणामुळे चित्रा वाघ यांच्या पतींवर सूडबुद्धाने कारवाई होत असल्याचा आरोप भाजपने केला. मात्र राज्य सरकारने भाजपच्या या आरोपाला फेटाळून लावले होते. त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत (Sachin Sawant) यांनी ट्विट करत भाजपला लक्ष्य केले आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर दाखल झालेला गुन्हा अयोग्य; आणि क्लिन चिट देऊनही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या मागे लावलेली ईडीची चौकशी योग्य. भाजपची ही भूमिका म्हणजे, चित मैं जिता पट तू हारा, अशी आहे,” असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

सचिन सांवत यांचे ट्विट…

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांची चौकशी तत्कालीन फडणीस सरकारने सुरु केली. त्यानंतर आता त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा म्हणजे सूडूबुद्धी. मात्र, क्लिन चिट देऊनही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मागे मोदी सरकारने ईडीची चौकशी लावली हे योग्य, भाजपची ही भूमिका म्हणजे चित मैं जिता पट तू हारा, अशी आहे, असे ट्विट सचिन सावंत यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER