‘कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत अन् योगीजी ‘All Is Well’ म्हणताहेत’; काँग्रेसचा योगी सरकारवर घणाघात

CM Yogi Adityanath-Randeep Surjewala

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा (Corona virus) कहर पाहताना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) आणि प्रशासनांवर भाजपाचे खासदार आणि आमदार पत्राद्वारे नाराजी व्यक्त करत आहेत. राज्यात कुठेही बेड्स, ऑक्सिजन किंवा वैद्यकीय सुविधांची कमतरता नाही, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांनी या दाव्याची पोलखोल केली आहे. आता काँग्रेसनेही योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“कुत्रे मृतदेहांचे लचके तोडत आहेत, मृतदेह नदीत फेकले जात आहेत, अन् योगीजी All Is Well म्हणत आहेत.” अशी घणाघात काँग्रेसने केला आहे. याबाबत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी ट्विट करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. संत आणि महंत स्वप्नातही खोटं बोलत नाहीत, असे सुरजेवाला यांनी ट्विट केला आहे. मात्र, असत्य बोलून योगीजी धर्माचा आणि राजधर्माचाही अपमान करत आहेत, असे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button