
नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेस (Congress) अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस हायकमांड पक्षातील इतर नेत्यांची विनवणी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यूपीए (UPA) अध्यक्षपदासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाची मागणी सातत्यानं करताना दिसत आहे. संजय राऊतांनी (Sanjay Raut) पुन्हा एकदा याबाबत वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसच्या गोटातून देखील जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत. कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांनी देखील या संदर्भात ट्वीट केले आहे. “बाहेरच्या मंडळींनी आधी यूपीएत यावं..मग मतांची दखल घेऊ”, असा टोला सातव यांनी संजय राऊतांना दिला आहे.
सध्या महाराष्ट्रात काही नाजूक प्रश्न आहेत.काँग्रेस पक्ष राज्यात समजूतदारपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करत आहे.
बाकी,
युपीएच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आहेत आणि त्याच राहतील. बाहेरच्या मंडळींनी युपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ.— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) March 26, 2021
कॉंग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) ट्विटमध्ये म्हणाले, सध्या महाराष्ट्रात काही नाजूक प्रश्न आहेत. काँग्रेस पक्ष राज्यात समजूतदारपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करत आहे. बाकी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्याच राहतील. बाहेरच्या मंडळींनी युपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला