काँग्रेसची अयोध्येच्या राम मंदिरासाठी निधी-संकलन मोहीम !

- पोस्टर लागले, राजीव गांधी जी का सपना हो रहा साकार …’

Ram mandir

भोपाळ : अयोध्या येथे बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या निधी – संकलनासाठी मध्य प्रदेशात काँग्रेसने ‘राजीव गांधी का सपना हो रहा साकार …’ अशी हाक देत मोहीम सुरू केली आहे ! मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राम मंदिर उभारणीसाठी जमेल तेवढा निधी देण्याची विनंती करणारे पोस्टर्स राजीव गाधींच्या फोटोसह झळकले आहेत. (Congress is collectiing rupees for building ram temple)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या जवळचे आमदार पी. सी. शर्मा यांनी निधी उभारणी मोहीम सुरु केली आहे. भोपाळमध्ये यासाठी फलक लावले असून त्यामध्ये राम मंदिराची निर्मिती करणे हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे स्वप्न होते. त्यासाठी निधी द्या, असे आवाहन केले आहे.

पोस्टरवर राजीव गांधींचा फोटो

भोपाळमधील न्यू मार्केटमधील हनुमान मंदिरासमोर यासाठी लावलेल्या पोस्टरवर राजीव गांधी यांचा १९८९ मधील राजीव गांधी अयोध्या येथील राम मंदिराचे भूमिपूजन करतानाचा फोटो आहे. पोस्टरवर राम मंदिर ट्रस्टचा बँक अकाऊंट नंबरही दिला आहे. या अकऊंटमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त निधी द्यावा करावे असे आवाहन पी. सी शर्मा यांनी केले आहे. पोस्टरवर ‘राजीव गांधी जी का सपना हो रहा साकार राम मंदिर ले रहा आकार’, ‘मंदिर निर्माण में हाथ बढ़ाएं, आओ प्रभु राम का घर सजाएं’ असे संदेश आहेत.

दरम्यान, यापूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही राम मंदिर निर्माणचे स्वागत केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीसुद्धा राम मंदिर निर्माणचे स्वागत करत राजीव गांधींची अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याची इच्छा होती, असे म्हटले आहे. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी जमा करण्याचे काम सुरू केले.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर भाजपा आणि हिंदुत्वादी संघटनांनी निधी उभारणीसाठी मोहीम हाती घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER