उत्तरप्रदेश सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची कोल्हापुरात निदर्शने

Kolhapur

कोल्हापूर : लोकप्रतिनिधी आणि खासदार म्हणून राहुल गांधी उत्तर प्रदेातील पिडीत कुटुंबाला भेटण्यासाठी जात होते. राहुल गांधी यांची ज्या पध्दतीने आडवणूक करुन वागणूक देण्यात आली. ती निषेधार्ह आहे. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट आणा. अन्यायाविरोधात काँग्रेसचा लढा कायमपणे सुरू राहील, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिवाजी चौकात निदर्शनावेळी गुरूवारी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांचे पोस्टर जाळले. तसेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॅन्डल मार्च केले.

उत्तरप्रदेश सरकराने राहुल गांधी यांना चुकीची वागणूक दिली. याप्रकरणी शिवाजी चौकात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. मुलीवर होतोय अत्याचार कुठे आहे योगी सरकार, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, योगी सरकार डरती है… पोलीस को आगे करती है.. आदी घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

उत्तरप्रदेशात मागासवर्गीय मुलीवर अत्याचार आणि खून झाला. या पिडीत कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली. हा हुकूमशाहीचाच प्रकार आहे. घडल्या प्रकाराचा काँग्रेसतर्फे तिव्र निषेध करत असल्याचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ. पी. एन. पाटील यांनी सांगितले. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हापरिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपमहापौर संजय मोहिते, करवीर पंचायत समिती सभापती अश्निनी धोत्रे, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, सुरेश कुराडे, शोभा कवाळे, आदी कार्यकर्ते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER