नोटाबंदी विरोधात काँग्रेसचं प्रदर्शन

congress-protest-against-demonetization

नागपूर : नोटाबंदीच्या विरोधात गुरुवारी काँग्रेसचे नेते आणि आमदारांनी विधान भवन परिसरात विरोध प्रदर्शन केलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, प्रणीति शिंदे, वर्षा गायकवाड़ तसेच अनेक आमदार या विरोध प्रदर्शनात सहभागी झालेत.

या दरम्यान पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत, नोटाबंदीमुळं सामान्य नागरिकांचं जगणं कठीण झालयं. नोटाबंदीचा निर्णय सामान्य जनतेवर लादण्यात आलाय.

सोबतच काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनीही नोटाबंदीच्या निर्णयाचा विरोध केलाय. या निर्णयामुळं जनता त्रस्त झाली असून जनता नक्कीच भाजप सरकारला धडा शिकवणार.