काँग्रेसच्या अध्यक्षांचे नामांतर चालते, ‘संभाजीनगर’ का नाही ?

आचार्य तुषार भोसलेंचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न

tushar bhosle & Balasaheb Thorat

औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी ठाम विरोध दर्शवला आहे. यावर भाजपाच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी थोरातांना प्रश्न केला, काँग्रेसच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनियाजी गांधी यांचे मूळ नाव काय आहे, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. त्यांचे नामांतर तुम्हाला चालते मग, औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ का नाही?

राजकीय फायद्यासाठी नामांतराचा उपयोग करण्याचे धंदे काँग्रेसने बंद करावेत. त्यांचा इटालियन अजेंडा महाराष्ट्रात चालणार नाही. औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजे, असे भोसले म्हणालेत.

भोसले यांनी याबाबत शिवसेनेलाही टोमणा मारला. म्हणालेत – लाचार झालेल्या शिवसेनेला, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि त्यांचे संपादक संजय राऊत यांना माझे आव्हान आहे की मर्दानगीच्या केवळ बाता मारण्यापेक्षा संभाजीनगर, धाराशिव असे नामांतर करुन खरी मर्दानगी दाखवा.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘संभाजीनगर’ नामांतरणाचा मुद्दा लावून धरला आहे. सारखे शिवसेनेला ढोसणे सुरू केले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना एका प्रश्नाच्या उत्तरात बाळासाहेब थोरात म्हणालेत की, औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याला काँग्रेसचा ठाम विरोध आहे. त्यानंतर या वादात काँग्रेसही ओढली गेली आहे. लवकरच औरंगाबाद मनपाची निवडणूक होणार आहे त्यामुळे किमान ही निवडणूक होईपर्यंत तरी हा मुद्दा चर्चेत राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER